eduqet history icon

एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 प्रश्न पृष्ठ क्रमांक - 9 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 81 ते 90

81. पाचव्या अनुसूचीमधील अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासनासंबंधी राज्यघटनेतील तरतुदी ____

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

82. ‘स्वामित्व’ (SWAMITVA) योजनेची उद्दिष्टे खालील प्रमाणे कोणती आहेत ?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

  • i. ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे
  • ii. शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनीच्या अचूक नोंदी तयार करणे
  • iii. मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे
  • iv. मालमत्ता कर निश्चित करणे
पर्यायी उत्तरे

83. लोकसभेच्या ‘शून्य प्रहर’ (Zero Hour) संदर्भात खालील विधाने विचारात घेता खालीलपैकी कोणते/ ती विधाने बरोबर आहेत?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

  • i. प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि कागदपत्रे ठेवण्याआधीची वेळ आणि सभागृहात कोणतेही सूचीबद्ध कामकाज सुरू होण्यापूर्वीची वेळ ‘शून्य प्रहर’ म्हणून ओळखली जाते.
  • ii. शून्य प्रहर दरम्यान मुद्दे मांडण्यासाठी, सदस्य दररोज सकाळी 8.00 ते 9.30 या वेळेत सभापती सूचना देतात.
  • iii. सध्या, शून्य तासा दरम्यान प्राधान्य क्रमानुसार दररोज तीस प्रकरणे ‘मुद्दे’ मांडण्याची परवानगी आहे.
  • iv. शून्य तासाबाबत नियमात कोणतीही तरतूद नसल्याने, कोणत्याही दिवशी किती प्रकरणे मांडता येतील यावर कमाल मर्यादा नाही.
पर्यायी उत्तरे

84. भारतातील केंद्र व राज्य शासन यांच्यातील कायदेविषयक परस्पर संबंधाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

  • i. शेतजमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे.
  • ii. शेती योग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर हा विषय संघ सूची मध्ये समाविष्ट आहे.
  • iii. करमणूक कर हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे.
  • iv. ‘पुरातन वस्तू संग्रहालये’ हा विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट.
पर्यायी उत्तरे

85. घटनापरिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदीचा समावेश करण्यात आला. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांचा त्यात समावेश नाही ?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

  • i. अनुच्छेद 51अ नुसार मूलभूत कर्तव्य
  • ii. अनुच्छेद 368 नुसार घटनादुरुस्ती
  • iii. अनुच्छेद 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी
  • iv. अनुच्छेद 123 नुसार वटहुकूम
पर्यायी उत्तरे

86. नोव्हेंबर 2022 मध्ये 10 वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला ?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

87. खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा.

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

  • i. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली.
  • ii. यापूर्वी ते त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते.
  • iii. ते मूळचे छत्तीसगड राज्याचे आहेत.
पर्यायी उत्तरे

88. संयुक्त राष्ट्राच्या ‘पोषण वर्धन मोहिमे’ संदर्भात खालील विधाने तपासून खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

  • i. या मोहिमेच्या समन्वयक पदी अफशान खान यांची नेमणूक करण्यात आली.
  • ii. या मोहिमेच्या समन्वयक पदी लिंकन यांची नेमणूक करण्यात आली.
  • iii. 2030 पर्यंत कुपोषणाचे उच्चाटन करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
  • iv. ही मोहीम जगातील कुपोषण असलेल्या देशांमध्ये राबविण्यात येते.
पर्यायी उत्तरे

89. 2023 मधील महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

  • i. राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ.
  • ii. मराठवाडा दुग्धविकास महामंडळ.
  • iii. जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ.
  • iv. संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ.
पर्यायी उत्तरे

90. सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. या तीर्थक्षेत्राविषयी योग्य विधान ओळखा.

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

  • i. हे जैन समाजाचे तीर्थक्षेत्र आहे.
  • ii. हे तीर्थक्षेत्र झारखंड राज्यातील गिरधी येथे आहे.
  • iii. हे तीर्थक्षेत्र राजस्थान येथील अरवली पर्वत येथे आहे.
  • iv. हे हिंदू धर्मियांचे तीर्थक्षेत्र आहे.
पर्यायी उत्तरे