1. खालीलपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप हे भारतातील भू-सुधारणांचा भाग होते? i. मध्यस्थांचे निर्मूलन ii. कुळ पद्धती सुधारणा iii. जमीन धारणेवर कमाल मर्यादा निश्चिती iv. भू-धोरणांचे एकत्रीकरण पर्यायी उत्तरे 1 i, ii आणि iii 2 ii, iii आणि iv 3 i , ii आणि iv 4 वरीलपैकी सर्व
2. अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत? पर्यायी उत्तरे 1 शाळेतील मुली 2 प्रासंगिक कामगार 3 राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेखाली नाहीत असे ज्येष्ठ नागरिक 4 निवृत्त सैनिक
3. संतुलित वृद्धी दराचा उद्देश _________आहे पर्यायी उत्तरे 1 उत्पन्नाचा वृद्धी दर, उत्पादन वृद्धी दर आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा वृद्धी दर यांच्यातील समानता 2 उत्पन्नातील वृद्धी दर आणि लोकसंख्या वृद्धी दर यांच्यातील समानता 3 नैसर्गिक साधनसंपत्तीचा वृद्धी दर आणि उत्पन्नातील वृद्धी दर यांच्यातील समानता 4 नैसर्गिक साधनसंपत्तीचा वृद्धी दर आणि लोकसंख्या वृद्धी दर यांच्यातील समानता
4. नागरीकरण म्हणजे ____ i. शहरांमध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण ii. शहरांमध्ये लोकसंख्येचे विकेंद्रीकरण iii. खेड्यात लोकसंख्येचे केंद्रीकरण iv. लोकसंख्येचा घनतेच्या वाढ पर्यायी उत्तरे 1 फक्त i 2 फक्त i आणि ii 3 फक्त i आणि iv 4 वरीलपैकी सर्व
5. अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान (AMRUT) विषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. पर्यायी उत्तरे 1 AMRUT हे भारत सरकारचे प्रमुख अभियान आहे 2 गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांनी हे अभियान सुरु केले आहे 3 ते देशभरातील शहरांमधील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडविते 4 25 जुन 2015 मध्ये देशातील 500 शहरांमध्ये ते कार्यान्वयीत करण्यात आले
6. जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक ______ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असतो, त्यावेळी ते कुटुंब अनेक अंगांनी ( बहुमित) दरिद्री मानले जाते. पर्यायी उत्तरे 1 20.33 2 50.33 3 40.33 4 33.3
7. जुलै 1991 पासून अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले जात आहेत. यातील अधिक महत्त्वाचे आहेत: i. व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा ii. औद्योगिक विनीयंत्रण iii. निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उद्योग सुधारणा iv. वित्तीय क्षेत्र सुधारणा पर्यायी उत्तरे 1 i आणि ii 2 iii आणि iv 3 i, ii आणि iii 4 i, ii, iii आणि iv
8. विविध योजना दस्तऐवजातून नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे खालील प्रमाणे दिसून येतात. i. आर्थिक वृद्धी, आत्मनिर्भरता ii. बेकारी निर्मूलन, उत्पन्न विषमता घट iii. गरिबी निर्मूलन, आधुनिकीकरण iv. समावेशक आणि शाश्वत वृद्धी पर्यायी उत्तरे 1 i फक्त 2 ii फक्त 3 iii फक्त 4 i, ii, iii आणि iv
9. योजना निर्मिती आणि यशासाठी पुढील बाबींची गरज असते: i. नियोजन आयोग, आकडेवारी, उद्दिष्टे ii. लक्षे आणि अग्रक्रम निश्चिती, संसाधन संकलन iii. अभ्रष्ट आणि कार्यक्षम प्रशासन, योग्य विकास धोरण iv. प्रशासन काटकसर, शिक्षणाचा पाया पर्यायी उत्तरे 1 i फक्त 2 i आणि ii 3 i, ii आणि iii 4 i, ii, iii आणि iv
10. ‘एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो’ हे विधान _______ चे आहे. पर्यायी उत्तरे 1 जी. मिर्डाल 2 रॅग्नर नर्क्स 3 रॉबिन्स 4 मार्शल