81.भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करते म्हणजेच :
i.राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करते.
ii.राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले आहे.
iii.राज्य सर्व धर्मांना समान समजते.
iv.सर्व जनतेला श्रद्धा आणि पूजा करण्याचे स्वातंत्र्य आहे.
v.कोणत्याही अपवादाशिवाय, शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण (शिकवण) देण्यास स्वतंत्र आहेत.
82.कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हटले गेले?
83.‘पहिल्या लोकसभेच्या’ संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
i.25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 या कालावधीत झालेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 17 एप्रिल 1952 रोजी पहिल्यांदा लोकसभेची स्थापना करण्यात आली.
ii.पहिल्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 13 मे 1952 रोजी करण्यात आली.
iii.पहिल्या लोकसभेने आपला कालावधी पूर्ण केला आणि ती 1 एप्रिल 1957 रोजी विसर्जित झाली.
iv.श्री. जी. व्ही. मावळणकर हे पहिल्या लोकसभेचे उपसभापती होते.
84.भारतातील विविध राष्ट्रीय आयोगांच्या संदर्भात खालील तरतुदी विचारात घ्या व बरोबर तरतूद/ तरतुदी असलेला पर्याय निवडा :
i.भारतीय राज्यघटनेच्या कलम 339 नुसार अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली.
ii.‘राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990’ नुसार ‘राष्ट्रीय महिला आयोगाची’ स्थापना करण्यात आली.
iii.‘राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग अधिनियम 1992’ नुसार ‘राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाची’ स्थापना करण्यात आली.
iv.27 डिसेंबर 1993 रोजी ‘राष्ट्रीय मानवाधिकार आयोग’ स्थापन करण्यासंदर्भातील अध्यादेश काढण्यात आला.
85.कोणते कलम उच्च न्यायालयांना मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचा अधिकार देते :
86.कर्पुरी ठाकूर अलीकडे बातम्यांमध्ये होते. त्यांच्याबाबत खालीलपैकी काय खरे नाही?
87.जागतिक क्षुधा निर्देशांक 2023 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो?
88.पुढीलपैकी योग्य विधाने विचारात घ्या.
i.नव्या संसदेतील लोकसभेच्या आतील भागाची रचना ही राष्ट्रीय प्राणी सिंहाच्या संकल्पनेवर आधारित आहे.
ii.राज्यसभेची रचना भारताचे राष्ट्रीय फूल कमळाच्या संकल्पनेवर आधारित आहे.
iii.नव्या संसद भवनाचे उद्घाटन 28 मे 2023 रोजी करण्यात आले.
iv.लोकसभा अध्यक्षांच्या बाजूला ऐतिहासिक अशोक चक्राची स्थापना केली आहे.
89.आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 विषयी योग्य विधाने ओळखा :
i.या स्पर्धा चीनमधील हांगझोऊ या ठिकाणी भरवण्यात आल्या.
ii.उद्घाटन प्रसंगी लवलिना बोरगोहेन या नेमबाजाने भारताकडून ध्वजधारकाची भूमिका बजावली.
iii.या स्पर्धेत 28 सुवर्ण पदकांसह भारताने चौथे स्थान पटकावले.
iv.या स्पर्धेत एकूण 107 पदके भारताला मिळाली.
90.योग्य कथने ओळखा :
i.नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुरस्कार, 2023 प्रदान करण्यात आला.
ii.नर्गिस मोहम्मदी ह्या समता व महिलांचे हक्क यांच्या पुरस्कर्त्या आहेत.
iii.नर्गिस मोहम्मदी या शिरीन ईबादी यांनी स्थापन केलेल्या डिफेन्डर्स ऑफ ह्यूमन राइट सेंटरला, 2004 मध्ये सहभागी झाल्या.