एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 🏛️ राज्यशास्त्र प्रश्न
एकूण प्रश्नसंख्या : 15
पृष्ठ क्रमांक - 1 / 2
सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10
2. व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते जर
- i. व्यक्तीने स्वेच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर
- ii. व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यावर पाच वर्षाच्या कालावधीत त्यास 18 महिन्यांचा कारावास झाला असेल तर
- iii. फसवणूक/ गैरप्रकार करून नागरिकत्व मिळवलेले आहे असे भारत सरकारचे समाधान झाले तर
- iv. व्यक्तीने भारतीय राज्यघटनेची अनिष्ठा दाखवली असेल तर
3. भारतीय संविधानात स्वीकार केल्या संदर्भात खालीलपैकी योग्य जोडी/ जोड्या कोणती/ कोणत्या आहे/ आहेत ?
- i. अमेरिका - उपराष्ट्रपती पद
- ii. कॅनडा - केंद्र सरकारसाठी ‘युनियन’ ही संज्ञा
- iii. दक्षिण आफ्रिका - राज्यसभा निवडणूक पद्धती
- iv. आयर्लंड - राष्ट्रपतींकडून राज्यसभेत विशिष्ट क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या सदस्यांची नामनिर्देशन पद्धती
4. संसदीय राज भाषा समितीचा/चे मुख्य उद्देश्य खालीलपैकी कोणता/ते आहे/त ?
- i. संघाच्या (Union) अधिकृत उद्दिष्टांसाठी हिंदी भाषेच्या वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे आणि हिंदीचा वापर वाढवण्यासाठी शिफारशी करणे.
- ii. नवीन घटक राज्यांच्या भाषिक मागण्यांकडे लक्ष देणे आणि त्या संदर्भात सूचना करणे.
- iii. धोक्यात आलेल्या भाषा ओळखणे आणि त्यांच्या संरक्षणासाठी शिफारशी करणे.
- iv. स्थानिक भाषा शिक्षणाचे परीक्षण करणे आणि त्रि-भाषा सूत्राची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिफारशी करणे.
5. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या संदर्भात खालील अयोग्य विधान/ने ओळखा.
- i. जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या ⅕ सदस्यांनी अविश्वास ठराव मांडून तो संमत झाल्यास अध्यक्षांना पदाचा राजीनामा द्यावा लागतो.
- ii. जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाने घेतला.
- iii. जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाने घेतला.
- iv. जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्राचा दर्जा देण्याचा निर्णय वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळाने घेतला.
6. पुढीलपैकी बिगर- घटनात्मक संस्था कोणती/ कोणत्या आहेत?
- i. निती आयोग
- ii. राज्य वित्त आयोग
- iii. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग
- iv. केंद्रीय माहिती आयोग
7. लोकपाल आणि लोकायुक्त ( सुधारणा) अधिनियम, 2016 च्या प्रमुख तरतुदी:
- i. त्याने लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम, 2013 ( जो 16 जानेवारी 2014 रोजी लागू झाला) यात सुधारणा केल्या आहेत.
- ii. सार्वजनिक सेवकांनी (Public Servants) मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील सादर करण्याच्या तरतुदीशी संबंधित असलेले 2013 च्या कायद्यातील कलम 44 मध्ये देखील दुरुस्ती करण्यात आली आहे.
- iii. सर्व घटक राज्यांनी लोकायुक्त पदाची स्थापना एक वर्षाच्या आत करावी असे बंधनकारक करण्यात आले.
- iv. दुरुस्तीद्वारे सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील 30 दिवसात सादर करण्याच्या कालावधीची तरतूद हटविण्यात आली आहे.
8. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे कर्तव्य खालीलपैकी कोणते आहे/ आहेत?
9. भारताचे राष्ट्रीय पक्ष- स्थापना वर्ष संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
10. योग्य जोड्या जुळवा :
भाग | विषय |
---|---|
A.
भाग-I
|
i.
मूलभूत हक्क
|
B.
भाग- III
|
ii.
पंचायत राज
|
C.
भाग-IX
|
iii.
नागरिकत्व
|
D.
भाग-II
|
iv.
संघराज्य व त्याचे कार्यक्षेत्रे
|