एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 🏛️ राज्यशास्त्र प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 15 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

1 मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीचे खालीलपैकी कोण सदस्य आहेत?

  • i. पंतप्रधान
  • ii. लोकसभेतील विरोधी नेता
  • iii. राज्यसभेतील विरोधी नेता
  • iv. पंतप्रधानांद्वारे नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्री
  • v. लोकसभा सभापती

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

2 भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक या पदाची तरतूद आहे?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

3 ‘केशवानंद भारती’ खटल्याबाबत खालील विधाने विचारात घेऊन अचूक विधान/ने निवडा :

  • i. सदरहू खटला हा भारताचे सरन्यायाधीश अे .एन्. रे यांच्या नेतृत्वाखाली 13 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे चालला.
  • ii. सात विरुद्ध सहा न्यायमूर्तींच्या बहुमताने घटनापीठाने मूलभूत संरचना सिद्धांताची (Basic Structure Doctrine) रूपरेषा दिली.
  • iii. या खटल्याने ‘गोलखनाथ’ प्रकरणातील निर्णय बदलला गेला.
  • iv. सदरहू खटला हा न्यायालयीन सक्रियतेचे उदाहरण म्हणावे लागेल.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

4 भारताचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या अधिकाराखाली ठेवण्यात आला आहे?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

5 घटकराज्यातील आणीबाणीसंदर्भातील ‘बोम्मई खटल्या’ बाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?

  • i. बोम्मई खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 1994 मध्ये दिला.
  • ii. घटक राज्यात राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकते.
  • iii. सबळ कारण नसताना राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय रद्द करू शकते.
  • iv. घटकराज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता घेणे आवश्यक असते.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

6 अयोग्य जोडी ओळखा :

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

7 भारतातील घटना दुरुस्ती संदर्भात खालील विधान/विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा :

  • i. 10 व्या घटना दुरुस्तीनुसार दादरा व नगर हवेली हे प्रदेश भारतास जोडण्यात आले.
  • ii. 11 व्या घटनादुरुस्तीनुसार दिव, दमण व गोवा हे प्रदेश भारतास जोडण्यात आले.
  • iii. 15 व्या घटनादुरुस्तीनुसार केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधिमंडळांची स्थापना करण्यात आली.
  • iv. 22 व्या घटनादुरुस्तीनुसार मेघालय या राज्याची निर्मिती करण्यात आली.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

8 केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त किती माहिती आयुक्तांचा समावेश असतो?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

9 भारताच्या नागरिकत्वाविषयी खालीलपैकी योग्य विधान/ विधाने कोणती?

  • i. भारतामध्ये एकल नागरिकत्व पद्धती आहे.
  • ii. नागरिकत्व कायदा 1955 साली संमत करण्यात आला.
  • iii. भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

10 राज्यघटनेतील कोणती कलमे आपल्या देशातील निवडणूक व्यवस्थेसाठी तरतूद करतात ?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे