81.पाचव्या अनुसूचीमधील अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासनासंबंधी राज्यघटनेतील तरतुदी ____ .
82.‘स्वामित्व’ (SWAMITVA) योजनेची उद्दिष्टे खालील प्रमाणे कोणती आहेत ?
i.ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे.
ii.शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनीच्या अचूक नोंदी तयार करणे.
iii.मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे.
iv.मालमत्ता कर निश्चित करणे.
83.लोकसभेच्या ‘शून्य प्रहर’ (Zero Hour) संदर्भात खालील विधाने विचारात घेता खालीलपैकी कोणते/ ती विधाने बरोबर आहेत?
i.प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि कागदपत्रे ठेवण्याआधीची वेळ आणि सभागृहात कोणतेही सूचीबद्ध कामकाज सुरू होण्यापूर्वीची वेळ ‘शून्य प्रहर’ म्हणून ओळखली जाते.
ii.शून्य प्रहर दरम्यान मुद्दे मांडण्यासाठी, सदस्य दररोज सकाळी 8.00 ते 9.30 या वेळेत सभापतीस सूचना देतात.
iii.सध्या, शून्य तासा दरम्यान प्राधान्य क्रमानुसार दररोज तीस प्रकरणे (मुद्दे) मांडण्याची परवानगी आहे.
iv.शून्य तासाबाबत नियमात कोणतीही तरतूद नसल्याने, कोणत्याही दिवशी किती प्रकरणे मांडता येतील यावर कमाल मर्यादा नाही.
84.भारतातील केंद्र व राज्य शासन यांच्यातील कायदेविषयक परस्पर संबंधाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
i.शेतजमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे.
ii.शेतीयोग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर हा विषय संघ सूची मध्ये समाविष्ट आहे.
iii.करमणूक कर हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे.
iv.‘पुरातन वस्तू संग्रहालये’ हा विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे.
85.घटनापरिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदीचा समावेश करण्यात आला. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांचा त्यात समावेश नाही ?
i.अनुच्छेद 51अ नुसार मूलभूत कर्तव्य
ii.अनुच्छेद 368 नुसार घटनादुरुस्ती
iii.अनुच्छेद 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी
iv.अनुच्छेद 123 नुसार वटहुकूम
ADVERTISEMENT
86.नोव्हेंबर 2022 मध्ये 10 वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला ?
87.खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा.
i.रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली.
ii.यापूर्वी ते त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते.
iii.ते मूळचे छत्तीसगड राज्याचे आहेत.
88.संयुक्त राष्ट्राच्या ‘पोषण वर्धन मोहिमे’ संदर्भात खालील विधाने तपासून खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
i.या मोहिमेच्या समन्वयकपदी अफशान खान यांची नेमणूक करण्यात आली.
ii.या मोहिमेच्या समन्वयकपदी लिंकन यांची नेमणूक करण्यात आली.
iii.2030 पर्यंत कुपोषणाचे उच्चाटन करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
iv.ही मोहीम जगातील कुपोषण असलेल्या देशांमध्ये राबविण्यात येते.
89.2023 मधील महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली?
i.राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ.
ii.मराठवाडा दुग्धविकास महामंडळ.
iii.जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ.
iv.संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ.
90.सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. या तीर्थक्षेत्राविषयी योग्य विधान ओळखा.
i.हे जैन समाजाचे तीर्थक्षेत्र आहे.
ii.हे तीर्थक्षेत्र झारखंड राज्यातील गिरधी येथे आहे.
iii.हे तीर्थक्षेत्र राजस्थान येथील अरवली पर्वत येथे आहे.