एमपीएससी
नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा
2024
पृष्ठ क्रमांक - 4 / 10
सराव प्रश्न क्रमांक : 31
ते 40
Language :
मराठी
English
31.
मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीचे खालीलपैकी कोण सदस्य आहेत?
-
i.
पंतप्रधान
-
ii.
लोकसभेतील विरोधी नेता
-
iii.
राज्यसभेतील विरोधी नेता
-
iv.
पंतप्रधानांद्वारे नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्री
-
v.
लोकसभा सभापती
32.
भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक या पदाची तरतूद आहे?
33.
‘केशवानंद भारती’ खटल्याबाबत खालील विधाने विचारात घेऊन अचूक विधान/ने निवडा :
-
i.
सदरहू खटला हा भारताचे सरन्यायाधीश यांच्या नेतृत्वाखाली 13 न्यायमूर्तींच्या घटनापिठापुढे चालला.
-
ii.
सात विरुद्ध सहा न्यायमूर्तींच्या बहुमताने घटनापठाने मूलभूत संरचना सिद्धांताची (Basic Structure Doctrine) रूपरेषा दिली.
-
iii.
या खटल्याने ‘गोरखनाथ’ प्रकरणातील निर्णय बदलला गेला.
-
iv.
सदरहू खटला हा न्यायालयीन सक्रियतेचे उदाहरण म्हणावे लागेल.
34.
भारताचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या अधिकाराखाली ठेवण्यात आला आहे?
35.
घटकराज्यातील आणीबाणीसंदर्भातील ‘बोम्मई खटल्या’ बाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
-
i.
बोम्मई खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 1994 मध्ये दिला.
-
ii.
घटक राज्यात राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकते.
-
iii.
सबळ कारण नसताना राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय राज्य करू शकते.
-
iv.
घटकराज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता घेणे आवश्यक असते.
36.
अयोग्य जोडी ओळखा :
37.
भारतातील घटना दुरुस्ती संदर्भात खालील विधान/विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा :
-
i.
10 व्या घटना दुरुस्तीनुसार दादरा व नगर हवेली हे प्रदेश भारतास जोडण्यात आले.
-
ii.
11 व्या घटनादुरुस्तीनुसार दिव, दमण व गोवा हे प्रदेश भारतास जोडण्यात आले.
-
iii.
15 व्या घटनादुरुस्तीनुसार केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधिमंडळांची स्थापना करण्यात आली.
-
iv.
22 व्या घटनादुरुस्तीनुसार मेघालय या राज्याची निर्मिती करण्यात आली.
38.
केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त किती माहिती आयुक्तांचा समावेश असतो?
39.
भारताच्या नागरिकत्वाविषयी खालीलपैकी योग्य विधान/ विधाने कोणती?
-
i.
भारतामध्ये एकल नागरिकत्व पद्धती आहे.
-
ii.
नागरिकत्व कायदा 1955 साली संमत करण्यात आला.
-
iii.
भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे.
40.
राज्यघटनेतील कोणती कलमे आपल्या देशातील निवडणूक व्यवस्थेसाठी तरतूद करतात ?