एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 📊 अर्थशास्त्र प्रश्न PAGE NO - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15

Language :

11 तेंडूलकर समितीने निदर्शनास आणल्याप्रमाणे, दारिद्र्याची संकल्पना ____ यासारख्या मूलभूत मानवी गरजांच्या संदर्भात सामाजिक वंचीततेशी संबंधित आहे. खालीलपैकी कोणते/ता मुद्दे/दा बरोबर आहे/त?

  • i. पुरेसे पोषण आवश्यक
  • ii. पुरेसा निवारा आवश्यक
  • iii. पुरेशी वस्त्र उपलब्धता आवश्यक
  • iv. टाळण्यायुक्त रोगांपासून सुटका आवश्यक
  • v. किमान शिक्षण आवश्यक

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

12 राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा - 2013 संबंधी खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

  • i. महिला सक्षमीकरण हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचे 2013 चे वैशिष्ट्य आहे.
  • ii. राज्य अन्न आयोगास 2013 च्या या कायद्याचे निरीक्षण, पुनरावलोकन आणि अंमलबजावणी करण्याचे अधिकार आहेत.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

13 खालील विधाने विचारात घ्या:

  • i. एकूण भांडवली साठ्यामध्ये डेव्हिड पिअर्स आणि जेरमी वॉरफोर्ड यांनी मानवनिर्मित भौतिक भांडवल, मानवी भांडवल आणि पर्यावरणीय भांडवल यांचा समावेश केला आहे.
  • ii. डेव्हिड पिअर्स आणि जेरमी वॉरफोर्ड यांच्या मते शाश्वत विकासाचा अर्थ असा आहे की विकास प्रक्रियेत मानवनिर्मित भौतिक भांडवल, मानवी भांडवल आणि पर्यावरणीय भांडवल कमी होते.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

14 राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, 2000 च्या उद्दिष्टांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चूक आहे/त?

  • i. मुलींच्या विवाहास विलंब करण्यास प्रोत्साहन द्यावे, विवाह 18 वर्षापेक्षा कमी वयात न होता शक्यतो 21 वर्षानंतर व्हावा.
  • ii. 2030 पर्यंत स्थिर लोकसंख्या साध्य करणे हे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे
# CANCELLED

15 खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?

  • i. 1950 च्या दशकाच्या उत्तरार्धात उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कोल आणि हूवर प्रतिमानने लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास यांचा संबंध जोडला आहे.
  • ii. कोल आणि हूवर प्रतिमानानुसार उच्च प्रजनन क्षमतेखाली जीएनपी अधिक वेगाने वाढेल.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे