एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 🏛️ राज्यशास्त्र प्रश्न PAGE NO - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15

Language :

11 राज्यपालांच्या संदर्भात खालीलपैकी कोणता/ते विधान/ने चुकीचे आहे/त ?

  • i. कलम 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार पदावर राहतील.
  • ii. कलम 155 नुसार राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती त्यांच्या सही आणि शिक्क्यासह वॉरंटद्वारे करतील.
  • iii. कलम 154 नुसार राज्याची कार्यकारी शक्ती राज्यपालांकडे असेल आणि ती त्यांच्याकडून थेट किंवा या संविधानानुसार त्यांच्या अधिनस्थ अधिकाऱ्यांद्वारे वापरली जाईल.
  • iv. कलम 163 नुसार राज्यपालांना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रीमंडळ असेल.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

12 खालील जोड्या जुळवा :

विषय कलम क्र.
A.
ग्रामसभा
i.
243 K
B.
राखीव जागा/आरक्षण तरतूदी
ii.
243 F
C.
पंचायतींच्या निवडणूका
iii.
243 A
D.
सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात
iv.
243 D

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

13 खालीलपैकी कोणती कथने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 20 शी संबंधित आहेत ?

  • i. कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्या खेरीज कोणत्याही व्यक्तिस तिचे जीवित किंवा व्यक्तीगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही.
  • ii. एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तिवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही.
  • iii. कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तिवर स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही.
  • iv. राज्य सहा ते चौदा वर्षे वयाच्या सर्व बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करील.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

14 खालीलपैकी कोणते विधान/विधाने कलम 168 मध्ये समाविष्ट नाही/नाहीत ?

  • i. प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील.
  • ii. जिथे राज्याच्या कायदेमंडळाची दोन सभागृहे असतील तिथे एक विधान परिषद आणि दुसरे विधानसभा म्हणून ओळखले जाईल.
  • iii. जिथे फक्त एकच सभागृह असेल तेथे ते विधानसभा म्हणून ओळखले जाईल.
  • iv. प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रादेशिक मतदार संघांमधून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले पाचशेपेक्षा जास्त आणि साठपेक्षा कमी नसलेले सदस्य असतील.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

15 भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात आणि भागात मूलभूत कर्तव्ये समाविष्ट आहेत ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे