एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 पृष्ठ क्रमांक - 9 / 10
सराव प्रश्न क्रमांक : 81 ते 90
82. खालीलपैकी कोणती कार्ये 24 जानेवारी, 1950 रोजी संविधान सभेने केली आहेत ?
- i. राष्ट्र ध्वजाचा स्वीकार
- ii. राष्ट्र गीताचा स्वीकार
- iii. राष्ट्र गानाचा स्वीकार
- iv. डॉ. राजेंद्र प्रसाद यांची भारताचे प्रथम राष्ट्रपती म्हणून निवड
83. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
- i. कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर, 1946 मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती.
- ii. कॅबिनेट मिशनने दोन संविधान सभेच्या विचारांना नकार दिला.
- iii. मुस्लिम लिगने क्रिप्स प्रस्ताव स्वीकारला होता.
84. आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशात झाली ?
85. खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.
- i. जी व्यक्ती, राष्ट्रपती म्हणून पद धारण करीत असेल अथवा जिने असे पद धारण केलेले आहे ती व्यक्ती, संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या फेरनिवडणुकीस पात्र असेल.
- ii. कोणतीही व्यक्ती राज्य सभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही.
86. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
- i. सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांकरीता आवेदनपत्रे दि. 15 नोव्हेंबर 2024 रोजी मागविण्यात आली.
- ii. राष्ट्रीय जल पुरस्कार नऊ प्रकारांमध्ये प्रदान केला जातो.
- iii. जल शक्ती मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय जल पुरस्कार 2016 वर्षापासून देण्यात येतात.
87. जागतिक शांतता निर्देशांक 2024 नुसार खालील राष्ट्रांची रँकींग चढत्या क्रमाने लावा.
- i. आयरलॅण्ड
- ii. ऑस्ट्रिया
- iii. आईसलॅण्ड
- iv. न्यूझिलंड
88. गुकेश डी. हे देशातील सर्वात उत्कृष्ट बुद्धिबळपटूपैकी एक आहेत. त्यांची कामगिरी खालीलप्रमाणे आहे, खालील कथने लक्षात घ्या आणि योग्य कथने ओळखा.
- i. 2024 मध्ये सिंगापुर येथे झालेल्या FIDE जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले.
- ii. 2024 मध्ये सिंगापुर येथे झालेल्या FIDE 45 व्या बुद्धिबळ ऑलिंपियाड (ओपन टीम) मध्ये सुवर्णपदक मिळविले.
- iii. 2024 मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या FIDE 45 व्या बुद्धिबळ ऑलिंपियाड (वैयक्तिक) मध्ये सुवर्णपदक मिळविले.
89. जोड्या लावा (ब्रिक्स शिखर परिषद) :
| अ | ब |
|---|---|
|
A.
16 वी ब्रिक्स शिखर परिषद
|
i.
नवी दिल्ली
|
|
B.
15 वी ब्रिक्स शिखर परिषद
|
ii.
बीजींग
|
|
C.
14 वी ब्रिक्स शिखर परिषद
|
iii.
जोहान्सबर्ग
|
|
D.
13 वी ब्रिक्स शिखर परिषद
|
iv.
कझान
|
90. अक्षय अन्न योजने मध्ये लाभार्थ्यांना खालीलपैकी कोणती वस्तू मोफत मिळेल ?
- i. तांदूळ
- ii. साखर
- iii. लाल मिरची पावडर
- iv. हळद
- v. ज्वारी