एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 PAGE NO - 5 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 41 ते 50

Language :

41 खालील विधाने विचारात घ्या:

  • i. 2017 मध्ये भारताची लोकसंख्येची घनता दक्षिण कोरियापेक्षा जास्त होती.
  • ii. 2017 मध्ये भारताची लोकसंख्येची घनता बांगलादेशापेक्षा कमी होती.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

42 सामाजिक सुरक्षा उपाययोजना प्रामुख्याने दोन प्रमुख प्रकारामध्ये विभागल्या जातात. खालीलपैकी कोणते पर्याय ते वर्ग सर्वाधिक अचुकपणे दर्शवतात?

  • i. सामाजिक विमा
  • ii. सामाजिक कल्याण
  • iii. सामाजिक सहाय
  • iv. सामाजिक समावेशकता

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

43 महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्था (PDS) संदर्भात पुढील विधानांचा विचार करा. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/त?

  • i. डिसेंबर 2025 पर्यंत राज्यात एकूण 270.48 लाख शिधापत्रिकाधारक होते.
  • ii. 31 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यात 51,636 रास्त भाव दुकाने कार्यरत होती.
  • iii. ऑक्टोबर 2025 पर्यंत सुमारे 1.55 कोटी कुटुंबांना आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे शिधावस्तूंचा लाभ देण्यात आला.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

44 तेंडूलकर समितीच्या अंदाजानुसार 2004-05 मध्ये __% ग्रामीण लोकसंख्या व __% शहरी लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली होती.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

45 खालीलपैकी कोणते जमिनीच्या उपविभागणी आणि तुकडे होण्याचे तोटे आहेत?

  • i. जमिनीची नासाडी
  • ii. प्रच्छन्न बेरोजगारी
  • iii. जमीन व्यवस्थापन सोपे करणे
  • iv. कमी उत्पादकता

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

46 तेंडूलकर समितीने निदर्शनास आणल्याप्रमाणे, दारिद्र्याची संकल्पना ____ यासारख्या मूलभूत मानवी गरजांच्या संदर्भात सामाजिक वंचीततेशी संबंधित आहे. खालीलपैकी कोणते/ता मुद्दे/दा बरोबर आहे/त?

  • i. पुरेसे पोषण आवश्यक
  • ii. पुरेसा निवारा आवश्यक
  • iii. पुरेशी वस्त्र उपलब्धता आवश्यक
  • iv. टाळण्यायुक्त रोगांपासून सुटका आवश्यक
  • v. किमान शिक्षण आवश्यक

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

47 राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा - 2013 संबंधी खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

  • i. महिला सक्षमीकरण हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचे 2013 चे वैशिष्ट्य आहे.
  • ii. राज्य अन्न आयोगास 2013 च्या या कायद्याचे निरीक्षण, पुनरावलोकन आणि अंमलबजावणी करण्याचे अधिकार आहेत.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

48 खालील विधाने विचारात घ्या:

  • i. एकूण भांडवली साठ्यामध्ये डेव्हिड पिअर्स आणि जेरमी वॉरफोर्ड यांनी मानवनिर्मित भौतिक भांडवल, मानवी भांडवल आणि पर्यावरणीय भांडवल यांचा समावेश केला आहे.
  • ii. डेव्हिड पिअर्स आणि जेरमी वॉरफोर्ड यांच्या मते शाश्वत विकासाचा अर्थ असा आहे की विकास प्रक्रियेत मानवनिर्मित भौतिक भांडवल, मानवी भांडवल आणि पर्यावरणीय भांडवल कमी होते.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

49 राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, 2000 च्या उद्दिष्टांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चूक आहे/त?

  • i. मुलींच्या विवाहास विलंब करण्यास प्रोत्साहन द्यावे, विवाह 18 वर्षापेक्षा कमी वयात न होता शक्यतो 21 वर्षानंतर व्हावा.
  • ii. 2030 पर्यंत स्थिर लोकसंख्या साध्य करणे हे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे
# CANCELLED

50 खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?

  • i. 1950 च्या दशकाच्या उत्तरार्धात उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कोल आणि हूवर प्रतिमानने लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास यांचा संबंध जोडला आहे.
  • ii. कोल आणि हूवर प्रतिमानानुसार उच्च प्रजनन क्षमतेखाली जीएनपी अधिक वेगाने वाढेल.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे