एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 🏛️ राज्यशास्त्र प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 15 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

1 कोणत्या समापन (चर्चा समाप्ती) प्रस्तावा अंतर्गत, फक्त महत्त्वाचे कलम चर्चेसाठी आणि मतदानासाठी घेतले जातात आणि मध्यवर्ती कलमे वगळली जातात आणि मंजूर झाल्याचे गृहित धरले जातात?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

2 खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा:

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

3 राज्याच्या महाअधिवक्त्याचे पारिश्रमिक (remuneration) कोण निर्धारित करतात?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

4 खालीलपैकी योग्य कथने ओळखा:

  • i. उच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरणाला प्रतिषेध आदेश जारी केला जातो आणि त्याचा उद्देश त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून प्रतिबंध आदेश देणे आहे.
  • ii. प्रतिषेध आदेश प्रशासकीय संस्थाविरुद्ध जारी केला जावू शकतो.
  • iii. प्रतिषेध आदेश न्यायिक व अर्धन्यायिक संस्थाविरुद्ध जारी केला जावू शकतो.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

5 खालीलपैकी चुकीचे विधान/ने कोणते आहे?

  • i. बी.एन. राव हे घटना समितीचे सल्लागार होते.
  • ii. बी.एन. राव यांनी घटनेचा मसुदा ऑक्टोबर, 1947 मध्ये तयार केला.
  • iii. बी.एन. राव यांनी तयार केलेल्या घटनेच्या मसुद्यामध्ये 310 कलमे व 8 अनुसूची होत्या.
  • iv. बी.एन. राव यांनी तयार केलेल्या घटनेच्या मसुद्यामध्ये 243 कलमे व 13 अनुसूची होत्या.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

6 भारतीय राज्यघटनेतील बाराव्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश केला आहे?

  • i. कलात्मक दृष्टीकोणाचे प्रवर्धन, अग्निशमन सेवा
  • ii. दहनभूमी व विद्युत दाहिनी
  • iii. बाजार व जत्रा, ग्रामीण गृहनिर्माण
  • iv. अपंग व मतिमंद यांच्या हितसंबंधाचे संरक्षण, पर्यावरणाचे संरक्षण

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

7 मूलभूत कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडण्यासाठी, संविधानाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आयोगाने शिफारस केली आहे, ____.

  • i. निवडणुकीत मतदान करण्याचे कर्तव्य
  • ii. कर भरणे
  • iii. औद्योगिक संस्थाचे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण देणे, हे कर्तव्य आहे
  • iv. मुलांच्या शिक्षण, शारीरिक आणि नैतिक कल्याणाच्या बाबतीत कौटुंबिक मूल्यांची आणि जबाबदार पालकत्वाची भावना जोपासणे

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

8 संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीबाबत खालीलपैकी चुकीचे विधान/ने कोणती आहेत?

  • i. पंडित नेहरू यांनी या समितीच्या निर्मितीची शिफारस 1963 मध्ये केली.
  • ii. लोकसभेमधून निवडून आलेल्या सदस्यामधूनच या समितीचा अध्यक्ष निवडला जातो.
  • iii. 1974 पासून लोकसभेमधून 15 तर राज्यसभेमधून 7 सदस्य या समितीवर निवडले जातात.
  • iv. या समितीच्या सदस्यांचा कार्यकाल दोन वर्षाचा असतो.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

9 पुढील विधानांपैकी राष्ट्रपतींच्या नकाराधिकारसंबंधी कोणती विधाने योग्य आहेत?

  • i. राष्ट्रपती विधेयकाला त्यांची संमती राखून ठेवू शकतात.
  • ii. राज्यपाल त्यांना योग्य/उचित वाटेल असे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखीव ठेवू शकतात.
  • iii. राष्ट्रपती संसदेकडे पुनर्विचारार्थ विधेयक दोन्ही सभागृहांना संदेशासह पाठवू शकतात.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

10 पुढील विधानांमधून आंतरराज्यीय परिषदांसंबंधी योग्य विधाने शोधा:

  • i. याचा उल्लेख अनुच्छेद क्रमांक 263 मध्ये आहे.
  • ii. याची स्थापना करण्याचा राष्ट्रपतींना अधिकार आहे.
  • iii. भारताच्या राष्ट्रपतींनी या अधिकाराचा आजवर वापर केलेला नाही आणि अनुच्छेद क्रमांक 263 अंतर्गत आजवर कोणतीही आंतरराज्य परिषद स्थापन केलेली नाही.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे