71. साधारणपणे पोरिफेरामध्ये गेमेट कशामुळे तयार होतात ? पर्यायी उत्तरे 1 कोयानोसाईट्स 2 आर्किओसाईट्स 3 मायोसाईट्स 4 पिनाकोसाईट्स
72. तापमानातील प्रत्येक 1°C वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग ___ से.मी./सेकंद ने वाढतो. पर्यायी उत्तरे 1 6.1 2 0.61 3 61 4 16
73. विशिष्ट उष्णतेचे, सी.जी.एस्. प्रणालीतील एकक ___ हे आहे. पर्यायी उत्तरे 1 कॅलरीज् / ग्रॅम 2 कॅलरीज् / ग्रॅम डिग्री सेल्सिअस 3 कॅलरीज् डिग्री सेल्सिअस / ग्रॅम 4 वरीलपैकी कोणतेच नाही
# CANCELLED 74. विद्युतधारेने विद्युतरोधकांत खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते ? पर्यायी उत्तरे 1 विद्युतरोधकातील विद्युत धारेचा वर्ग 2 विद्युतरोधकातील विद्युत धारेचा घन 3 विद्युतरोधकांतील विद्युत धारेचे वर्गमूळ 4 त्यातील विभवांतराचा वर्ग
75. डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो ? पर्यायी उत्तरे 1 स्टॅफिलोकोकस ऑरियस 2 बोर्डेटेला पर्टयुसिस 3 स्ट्रेप्टोकोकस पायोजीनस् 4 सॉल्मोनेला प्रजाती
76. खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे आहे ? पर्यायी उत्तरे 1 जीवनसत्व ए 2 जीवनसत्व डी 3 जीवनसत्व इ 4 जीवनसत्व के
77. ___ ही औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था, पचनसंस्था यांच्यावरील संवेदी चेता तंतूच्या टोकावर बद्ध राहतात. पर्यायी उत्तरे 1 कॅन्नाबिनॉईडस् 2 ओपिऑईड्स 3 मॉर्फिन 4 कोका-अल्कलॉईडस्
78. जर्मन सिल्वर हा मिश्रधातू खालील धातूंच्या मिश्रणातून तयार होतो. पर्यायी उत्तरे 1 तांबे, जस्त, कथील 2 तांबे, निकेल, जस्त 3 तांबे, जस्त 4 तांबे, कथील
79. "ॲस्पिरिन" चे रसायनिक नाव पर्यायी उत्तरे 1 ओ-ॲसेटील सॅलिसिलीक ॲसीड 2 ओ-इथाईल सॅलिसिलीक ॲसीड 3 ओ-मिथाईल सॅलिसिलीक ॲसीड 4 ओ-बेंझॉईल सॅलिसिलीक ॲसीड
80. कठीण आणि मृदु - आम्ल आणि अल्कली या संज्ञा कोणी दिल्या ? पर्यायी उत्तरे 1 ब्रॉन्स्टेड 2 लेविस 3 पियरसन 4 फ्रैंकलिन