एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 🌎 भूगोल प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 10 पृष्ठ क्रमांक - 1 / 1

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

1 खालील विधानांचा विचार करा व बरोबर विधान/विधाने असलेला पर्याय निवडा ?

  • i. रायरेश्वरपासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगररांग असे म्हणतात.
  • ii. सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे अलग झालेले आहे.
  • iii. हरिश्चंद्र-बालाघाट डोंगररांगेमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे अलग झालेले आहे.
  • iv. गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारी सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

2 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या तीन जिल्ह्यांमध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धीदर दर्शवितो ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

3 संचालनालय, खनिज विभाग, नागपूर यांच्या 2014 च्या आकडेवारी प्रमाणे महाराष्ट्रात लोहखनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात अधिक आहेत ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

4 जोड्या जुळवा.

कोपेन हवामान हवामान प्रकार
A.
Cwg
i.
उष्ण वाळवंट
B.
BWhw
ii.
थंड आणि आर्द्र हिवाळा
C.
Dfc
iii.
उष्ण कटिबंधीय मोसमी
D.
Amw
iv.
मेसोथर्मल

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

5 खालील विधाने विचारात घ्या.

  • i. चिनाब नदी झोझीला खिंडीजवळ उगम पावते.
  • ii. रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ आहे.
  • iii. सतलज नदीचा उगम रकास तलावाजवळ आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

6 खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत अचुक आहे/आहेत ?

  • i. महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो.
  • ii. राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून असल्याचे आढळते.
  • iii. नैऋत्य मोसमी वारे घाट माथ्यावरून पूर्वेकडे जातात तेंव्हा त्यांची बाष्पधारणशक्ती वाढते.
  • iv. विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

7 खालीलपैकी कोणते विधान/ने चुकीचे/ची आहे/आहेत ?

  • i. कामठी कोळसा क्षेत्र आंब नदीच्या खोऱ्यात आहे.
  • ii. वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपुर व यवतमाळ जिल्ह्यात विभागले आहे.
  • iii. उमरेड कोळसा क्षेत्र कन्हान नदीच्या खोऱ्यात आहे.
  • iv. महाराष्ट्रातील तुर्भे या ठिकाणी कॅनडाच्या सहाय्याने अप्सरा आणि ब्रिटनच्या सहाय्याने सायरस या अणुभट्ट्या उभारण्यात आलेल्या आहेत.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

8 पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्देश्य आहेत ?

  • i. भूमी उपयोजन आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे.
  • ii. वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे क्षरण थांबवणे.
  • iii. गुंतवणूक कमी, उत्पादन खर्चात वाढ करणे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

9 खालील विधाने पहा.

  • i. महात्मा फुले कृषि विद्यापिठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर येथे आहे.
  • ii. फुले यशोदा गव्हाचे वाण महात्मा फुले कृषि विद्यापिठाने 1998 मधे विकसित केले.
  • iii. महाराष्ट्र कृषि विद्यापिठाचे कार्यालय मुंबई येथे होते.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

10 खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

  • i. वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत.
  • ii. खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे.
  • iii. मन्याड नदी खोरे गोदावरी नदी खोऱ्यात आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे