एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 PAGE NO - 7 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 61 ते 70

Language :

61 राज्यपालांच्या संदर्भात खालीलपैकी कोणता/ते विधान/ने चुकीचे आहे/त ?

  • i. कलम 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार पदावर राहतील.
  • ii. कलम 155 नुसार राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती त्यांच्या सही आणि शिक्क्यासह वॉरंटद्वारे करतील.
  • iii. कलम 154 नुसार राज्याची कार्यकारी शक्ती राज्यपालांकडे असेल आणि ती त्यांच्याकडून थेट किंवा या संविधानानुसार त्यांच्या अधिनस्थ अधिकाऱ्यांद्वारे वापरली जाईल.
  • iv. कलम 163 नुसार राज्यपालांना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रीमंडळ असेल.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

62 खालील जोड्या जुळवा :

विषय कलम क्र.
A.
ग्रामसभा
i.
243 K
B.
राखीव जागा/आरक्षण तरतूदी
ii.
243 F
C.
पंचायतींच्या निवडणूका
iii.
243 A
D.
सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात
iv.
243 D

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

63 खालीलपैकी कोणती कथने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 20 शी संबंधित आहेत ?

  • i. कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्या खेरीज कोणत्याही व्यक्तिस तिचे जीवित किंवा व्यक्तीगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही.
  • ii. एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तिवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही.
  • iii. कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तिवर स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही.
  • iv. राज्य सहा ते चौदा वर्षे वयाच्या सर्व बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करील.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

64 खालीलपैकी कोणते विधान/विधाने कलम 168 मध्ये समाविष्ट नाही/नाहीत ?

  • i. प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील.
  • ii. जिथे राज्याच्या कायदेमंडळाची दोन सभागृहे असतील तिथे एक विधान परिषद आणि दुसरे विधानसभा म्हणून ओळखले जाईल.
  • iii. जिथे फक्त एकच सभागृह असेल तेथे ते विधानसभा म्हणून ओळखले जाईल.
  • iv. प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रादेशिक मतदार संघांमधून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले पाचशेपेक्षा जास्त आणि साठपेक्षा कमी नसलेले सदस्य असतील.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

65 भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात आणि भागात मूलभूत कर्तव्ये समाविष्ट आहेत ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

66 खालील विधाने बरोबर की चूक ते सांगा :

  • i. क्ष-किरण या विद्युत चुंबकीय लहरी आहेत.
  • ii. क्ष-किरणांची तरंगलांबी खूप कमी असते.
  • iii. क्ष-किरणांच्या वर ऋण भार असतो.
  • iv. क्ष-किरण विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

67 जोड्या जुळवा.

यादी I यादी II
A.
अल्फा कण
i.
क्युरी
B.
बिटा कण
ii.
इलेक्ट्रॉन
C.
किरणोत्साराचे एकक
iii.
2He4 - हेलियम अणु
D.
गॅमा किरण
iv.
उच्च ऊर्जेचे फोटॉन

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

68 अप्रकट विलयन उष्मा म्हणजे ___.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

69 पृथ्वीच्या वातावरणाचे थर जे जमिनीपासून वरच्या दिशेने क्रमाने आहेत. त्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

70 ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणते ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे